
Bhaskar Jadhav News : 'गद्दार प्रवृत्ती उद्याच्या होळीच्या सणात…'; खेडच्या सभेत भास्कर जाधव गरजले
रत्नागिरीमधील खेड शहरात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या सभेच्या सुरुवातीला भास्कर जाधव यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आज आघात झाल्यानंतर पहिल्यांदाच बाहेर पडले आणि ते कोकणात आले आहेत. झालेल्या आघाताचा बदला घ्यायाचा असेल तर उद्धव ठाकरेंचा विश्वास देखील माझ्या कोकणावरच दिसतोय. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे असे भास्कर जाधव म्हणाले.
आपण उद्धव ठाकरे यांना सांगण्याची गरज आहे, की शिवसेना प्रमुखांनी आमचा सन्मान केला आम्हाला प्रतिष्ठा पद आणि सत्ता मिळवून दिली आहे. काही लोकांनी शिवसेनेचा विचार मातीत मिळवायचा विचार केला असेल तरी शिमग्याच्या सणाच्या दिवशी अशा प्रकारची गद्दार प्रवृत्ती उद्याच्या होळीच्या सणात जाळून पुन्हा शिवसेनेचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पक्ष प्रमुखांना दिल्याशिवाय राहणार नाही असे भास्कर जाधव म्हणाले.
योगेश कदमांना मला पराभूत करायय
पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली. रामदास कदम यांनी मतदार संघात काहीच विकास केला नाही. रामदास कदम म्हणजे तात्या विंचू आहेत. योगेश कदम यांना मला पराभूत करायचे आहे. असेही भास्कर जाधव म्हणाले.
कोकणातील नैसर्गिक संकटात रामदास कदम फिरले? कोरोना संकटात एकाही गावात गेला नाही. 5 वर्ष मंत्री होता, मतदारसंघात काहीही काम केलं नाही. केवळ मुलाकरिता दापोलीत निधी दिला असा आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना केला.