भीमा-कोरेगाव दंगल तिघांचा जामिनासाठी अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. 

मुंबई - भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. 

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चेतन आल्हाट, अक्षय आल्हाट आणि तुषार जवांजळ यांना अटक केली आहे. मात्र, केवळ आंबेडकर असे लिहिलेले टी-शर्ट घातल्यामुळे पोलिसांनी आम्हाला अटक केली असून, या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. न्या. भारती डांग्रे यांच्यापुढे अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. या अटकेमुळे तुषारला दहावीच्या परीक्षेला मुकावे लागले, असेही न्यायालयात सांगण्यात आले आहे. 

Web Title: Bhima Koregaon riots filed for bail