पुनर्वसित माळीणमध्ये घरांना पावसामुळे तडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

भीमाशंकर - नवीन जागेत पुनर्वसन झालेल्या माळीण गावठाणात (ता. आंबेगाव) शनिवारी (ता. २४) रात्री झालेल्या पहिल्याच पावसात भराव खचले, तसेच भिंतींना तडे गेले असून, रस्ते खचले आहेत. अंगणवाडीजवळ असलेल्या भिंतीला भेगा पडल्या असून, ड्रेनेजलाइन उखडल्या आहेत. गटारे छोटी असल्याने पावसाचे पाणी गटारावरून गेले. त्यातून काही ठिकाणी भराव वाहून गेला आहे. त्यामुळे माळीण ग्रामस्थ भयभीत झाले असून, पुन्हा माळीण फाट्यावर पत्रा शेडमध्ये स्थलांतर करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

माळीण गावावर ३० जुलै २०१४ रोजी डोंगर कोसळून ४४ कुटुंबांतील १५१ लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला होता. त्यात पहाटे लोकांना जीव गमवावा लागला होता. आमडे हद्दीत या ग्रामस्थांचे नवीन माळीण गावठाण करून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले होते. यातील ६७ घरांचा लोकार्पण सोहळा २ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यास दोन महिने झाल्यानंतर शनिवारी (ता. २४) रात्री झालेल्या पहिल्याच संततधार पावसामुळे (९७ मि.मी.) नवीन गावठाणातील घरांच्या भिंतीला तडे जाणे, भेगा पडणे, भराव खचणे, रस्ता तुटणे आदी प्रकार घडले आहेत. विजेच्या तारा निकृष्ट कामामुळे खाली आल्या आहेत.

Web Title: Bhimashankar news malin rain