भिवंडी, मालेगाव, पनवेलला प्रचाराची सांगता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - राज्यातील भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. या तिन्ही ठिकाणी येत्या 24 रोजी मतदान होणार आहे.

मुंबई - राज्यातील भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महापालिकांच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता झाली. या तिन्ही ठिकाणी येत्या 24 रोजी मतदान होणार आहे.

भिवंडीमध्ये शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, कोणार्क आघाडी, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेससह आदी उमेदवारांनी प्रचारफेरीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून खासदार कपिल पाटील, आमदार रूपेश म्हात्रे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डूखान,कोणार्क आघाडीचे विलास पाटील, "सप'चे अबू आझमी, राष्ट्रवादीचे गणेश नाईक आदी प्रचारात उतरले होते. 23 प्रभागात 90 जागांसाठी 560 उमेदवार रिंगणात आहेत.

मालेगाव : मालेगावमध्ये प्रमुख उमेदवारांनी आणि पक्षांनी प्रचारफेऱ्या काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 83 जागांसाठी 373 उमेदवार रिंगणात आहेत. 24 मे रोजी 516 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. शहराच्या पश्‍चिम भागात शिवसेना-भाजप व दोन्ही प्रभांगात अपक्षांसह तिरंगी लढत होत आहे 11 पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
पनवेल : पहिल्यांदाच होणाऱ्या पनवेल महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची, शेकाप- कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीसाठी अस्तित्वाची तर शिवसेनेसाठी चाचपणी ठरली आहे. 78 जागांवर भाजप रिपाई युती लढवीत आहे. भाजपकडून खासदार रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव परेश ठाकूर आणि रिपाईतर्फे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड रिंगणात आहेत.

Web Title: bhivandi, malegav, panvel publicity stop