Bhiwandi Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर

Bhiwandi Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर

ठाणेः ठाण्यातल्या भिवंडी येथे काल एक इमारत कोसळली होती. रात्रीपर्यंत या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता तब्बल सहा जण या घटनेत मृत झाले आहेत.

भिवंडीतील कैलासनगर येथे काल दुपारी इमारत कोसळल्याची घटना घडली. अजूनही बचावकार्य सुरु असून आतापर्यंत सहा जण मृत झाल्याची माहिती मिळत आहे. TDRF NDRF च्या जवानांनी दहा ते बारा जणांना सुखरुप बाहेर काढलं आहे. आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. बचावकार्य सुरु आहे.

Bhiwandi Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा ६ वर
Aditya Thackeray : …इथे गद्दारीला स्थान नाही; बाजार समिती निवडणूक निकालांवरून आदित्य ठाकरे कडाडले!

या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

या घटनेत सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. मुंबईमध्ये अनेक जुन्या इमारती आहेत. त्यामुळे सतत इमारती कोसळल्याच्या घटना घडत असतात. अशा प्रकरणांमध्ये महानगर पालिकांनी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमकडूनही घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com