'टीका करून सत्तेत आलात काय दिवे लावले'?- भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नाशिक जिल्ह्यातील आदीवासींना वन विभागाचे पट्टे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळ नाही. त्यांना तेरा कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत करताच वनमंत्री सुधीर मुनगंठीवार चवताळून उठले. कोणीही येतं अन काहीही आरोप करतो.

नागपूर - नाशिक जिल्ह्यातील आदीवासींना वन विभागाचे पट्टे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना वेळ नाही. त्यांना तेरा कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेत करताच वनमंत्री सुधीर मुनगंठीवार चवताळून उठले. कोणीही येतं अन काहीही आरोप करतो.

वनविभागाचा यांत संबध काय ? असा सवाल करत भुजबळ यांना रोखण्याचा प्रयत्न मुनगंठीवार यांनी यावर भुजबळ देखील भडकले. ‘ तुम्ही टीका करून सत्तेवर आलात. खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली. सत्तेवर आल्यापासून तुम्ही तरी काय दिवे लावले. असे प्रत्यूत्तर भुजबळ या्ंनी देताच मुनगंठीवार प्रचंड संतापले. तुम्ही कोण मला शिकवणार? असा जाब तावातावाने मुनगंठीवार यांनी केला. प्रचंड अस्वस्थतेनं मुनगंठीवार बोलत असल्याने भाजपचे सर्व आमदार त्यांच्या जवळ आले व त्यांना शांत केले. 

दरम्यान, भुजबळ यांनी पुरवणी मागण्यावर बोलताना अंबानी उद्योगसमुहाने राज्य सरकारचे दोन हजार कोटी रूपये अद्याप दिले नसल्याचा दावा करताच भाजप आमदार राज पुरोहित भडकले. त्यावर ‘राज ये अदाणी अंबानी आप के बस की बात नही’ असा टोला भुजबळ यांनी लगावला.

Web Title: bhujbhal criticise on BJP govrnment