राज्यसेवा मुख्य परीक्षेत नाशिकचे भूषण अहिरे प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत नाशिक येथील भूषण अहिरे हे राज्यात प्रथम आले आहेत. त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पूनम पाटील या महिलांमध्ये राज्यात प्रथम असून, सहायक पोलिस आयुक्तपदासाठी त्यांची निवड झाली आहे. 

आयोगाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 130 राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी परीक्षा घेतली. त्यासाठी राज्यातील एक लाख 91 हजार 563 उमेदवारांनी परीक्षा दिली. पूर्व परीक्षेच्या आधारे एक हजार 757 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. यातील 418 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. त्याचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. विविध पदांसाठी पात्र ठरलेल्या 130 जणांची यादी आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यामध्ये 34 महिला आणि दोन अपंग उमेदवार आहेत. 

पात्रता यादीनुसार 71 उमेदवार प्रथम वर्ग आणि 59 उमेदवार वर्ग दोनच्या पदांसाठी पात्र ठरले. आयोगाने उपजिल्हाधिकारी, सहायक पोलिस आयुक्त, विक्रीकर सहायक आयुक्त, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वित्त व लेखा सहायक संचालक, नगरपालिका मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, सहायक प्रादेशिक वाहतूक अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक भूमी अभिलेख, उत्पादन शुल्क उपअधीक्षक आदी पदांसाठी परीक्षा घेतली होती. 

Web Title: Bhushan Ahire first in State chief examination