Vidhan Sabha 2019 : होळकरांचे वंशजही भाजपमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनीही आज (ता.22) भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई : शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनीही आज (ता.22) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भूषणसिंह होळकर यांच्यासह माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, माजी आमदार संदेश कोंडविलकर आदी नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये रोज नवनवीन नेते पक्ष प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये येणाऱ्यांनी विधानसभेत निवडणुकीत सहकार्य करायचे आहे. त्यामुळे जंबो पक्ष प्रवेश होतात. भाजपच्या इनकमिंगमुळे विरोधकांही प्रश्न पडला आहे. पवार म्हणतात, ईव्हीएममुळे भाजप जिंकतो, पण 2004 पासून ईव्हीएम होते, पण जनतेचे काम करावे लागतात तेव्हा लोक ऐकतात, अशा शब्दात पाटील यांनी पवार यांना टोला लगावला आहे.

पाच वर्षांत मोदी सरकारने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. हा पक्ष कोणत्या घरात जन्माला आला हे पाहत नाही, प्रत्येकाला समाधान मिळेल असे काम करते, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhushan Singh holkar joins BJP in Presence of Chandrakant Patil