लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा; 'स्वाभिमानी' लढवणार 'इतक्या' जागा I Raju Shetti | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetti

माजी खासदार राजू शेट्टींचा हातकणंगले मतदार संघात (Hatkanangale Constituency) पराभव झाला होता.

Raju Shetti : लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींची मोठी घोषणा; 'स्वाभिमानी' लढवणार 'इतक्या' जागा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर येत आहे. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केलीये.

लोकसभा (Lok Sabha Election) आणि विधानसभेला दोन वर्षे बाकी असतानाच शेट्टींनी घोषणा करुन राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवलंय. राजू शेट्टींनी (Raju Shetti) मुहूर्त बघून घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाही रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शड्डू ठोकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगलेसह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आज केली.

माजी खासदार राजू शेट्टींचा हातकणंगले मतदार संघात (Hatkanangale Constituency) पराभव झाला होता. मात्र, शेट्टी पुन्हा एकदा त्याच मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढविण्याबाबत लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंबा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. राजू शेट्टींनी निवडणूक लढण्याबाबत स्वतः प्रतिक्रिया देत हा निर्णय जाहीर केला आहे.