
Sharad Pawar: राष्ट्रवादीला धक्का! महाजनांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासुन राजकीय नेते, कार्यकर्ते, मंत्री, पदाधिकारी यांच पक्षांतर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसुन येत आहे. या पक्षांतराचा येत्या निवडणुकीमध्ये परिणाम दिसुन येण्याची शक्यता आहे. अशातच आज राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून आत्तापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर महत्त्वाचे मानले जात आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जातोय.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावात हा प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा हा भाजपला होण्याची शक्यता आहे.
तर गेल्या काही दिवसांपुर्वी खेड येथील सभेमध्ये उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत विश्वास काका कदम, विजय मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार, राजेंद्र आंब्रे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधले हाही राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.