Sharad Pawar: भाजपचा राष्ट्रवादीला धक्का! पवारांच्या खास शिलेदार भाजपच्या गळाला; मिशन बारामतीसाठी हालचाली सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Sharad Pawar

Sharad Pawar: भाजपचा राष्ट्रवादीला धक्का! पवारांच्या खास शिलेदार भाजपच्या गळाला; मिशन बारामतीसाठी हालचाली सुरू

गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे उद्या (मंगळवारी) घड्याळ सोडून कमळ हाती घेणार आहेत. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार राहिले आहेत. भाजप कडून राष्ट्रवादीचा गड जिंकण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बारामती काबीज करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या हालचाली सुरू आहेत.

अशोक टेकवडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीला त्यांच्याच बाल्लेकिल्ल्यात मात देण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती आखण्यात आलं आहे.

अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील याबाबत राजकीय वर्तुळात शंका व्यक्त केली जात होती. आज ना उद्या ते पक्ष सोडतील अशी पुरंदरमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती. अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठं बळ मिळणार आहे.

भाजपने मिशन बारामती सुरू केलं आहे. या मिशन बारामतीचा भाग म्हणूनच टेकवडे यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत आहे. अशोक टेकवडे हे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. तशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली होती.