आता 8 ऑगस्टला 'या' मोठ्या नेत्यांचा होणार भाजपप्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- काँग्रेस-राष्ट्रवादी पूर्ण ढासळणार
- दोन माजी मंत्री, तीन विद्यमान आमदारांसह एका केंद्रिय माजी मंत्र्याचा होणार भाजप प्रवेश

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपमध्ये प्रवेश केला. आता येणाऱ्या 8 ऑगस्टला उत्तर महाराष्ट्रातील काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

8 तारखेला भाजपमध्ये काँग्रेसमधील शिरपूर येथून माजी राज्यमंत्री अमरीश पटेल, अक्कलकुवाचे आमदार के सी पाडवी, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील तर जळगाव मधून राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, धुळ्याचे माजी आमदार राज वर्धन कदमबांडे हे भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचं बोललं जातं आहे. या नेत्यांनी गेल्याच आठवड्यात गिरीश महाजन यांची भेट घेतली. तर जयकुमार रावल हे अमरीश पटेल यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big NCP and congress leader may enter in BJP on 8 August