दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; पुनर्मूल्यांकनाच्या उत्तरपत्रिका मिळणार ईमेलवर?

अशोक मुरुमकर
Monday, 6 July 2020

कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकुळी शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी अद्याप शैक्षणिक वर्ष सुरु झालेले नाही. परीक्षा सुद्धा घेता आल्या नाहीत. दहावी व बारावीचा निकाल कधील लागणार हे निश्‍चित नाही.

अहमदनगर : कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकुळी शिक्षणावर खूप मोठा परिणाम झाला आहे. यावर्षी अद्याप शैक्षणिक वर्ष सुरु झालेले नाही. परीक्षा सुद्धा घेता आल्या नाहीत. दहावी व बारावीचा निकाल कधील लागणार हे निश्‍चित नाही. मात्र, यावर्षीपासून निकालानंतर विषयाचे पुनर्मूल्यांकन दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाऱ्या उत्तर पत्रिका ई- मेलच्या माध्यमातून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रयत्न करत आहे. 
यावर्षी कोरोनामुळे दहावीचा एक पेपर झाला नाही. दहावी आणि बारावी सोडली तर इतर वर्गांचा एकही पेपर झाला नाही. दहावी- बारावीच्या परीक्षेंचे निकाल झाल्यानंतर काही विद्यार्थी विषयाचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. मात्र यंत्रा कोरोनामुळे यात अडचण येऊ शकते. त्यामुळे उत्तर पत्रिकेचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याबाबत राज्य मंडळाकडून चाचपणी सुरु आहे. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांनी विनंती केल्यावर त्यांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करतात. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर फोटोकॉपी देण्याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर मंडळ ई- मेलद्वारे फोटोकॉपी उपलब्ध करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकन छायाप्रती वेळेवर प्राप्त होणार आहेत. याचा परिणाम त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना छायाप्रती विद्यार्थ्यांना वेळेव उपलब्ध होत नाहीत. मात्र, ई मेलवर छायाप्रति दिल्यास त्याचा उपयोग होणार आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाले, विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाबाबत आलेल्या अर्जावर उत्तरपत्रिका देण्यासाठी ईमेलवर पाठवता येथील हा या पर्यायाचा आम्ही विचार करत आहोत. मात्र, निर्णय झालेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big news for 10th and 12th students will get the reevaluation answer sheet on email