कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आणखी 10, 15 वर्षे त्यांचीच हवा राहणार आहे. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले, तरी 2019मध्ये पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील "एनडीए'चे सरकार अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे आपण भाजपसोबतच राहणार आहोत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. 

आठवले म्हणाले, की 2019मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा 300च्या पुढे आणि एनडीएच्या जागा 400च्या पुढे जातील, असा आमचा विश्‍वास आहे. कॉंग्रेस 60-70 जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुका आता होत आहेत, त्यापैकी तीन राज्यांत भाजपची सत्ता निश्‍चित येईल. उर्वरित दोन राज्यांतही भाजप चांगले यश मिळवेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

राममंदिराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, की तेथील काही जमीन हिंदूंना आणि काही जमीन मुस्लिमांना द्यावी. इतिहास बघितला, तर ती सगळी बुद्धाची भूमी आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकानंतर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होते. तिथे उत्खनन केले, तर बुद्धाचे अवशेष सापडतील. त्यामुळे जर सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायची असेल, तर त्या ठिकाणी बुद्ध मंदिरासाठीसुद्धा काही जागा दिली पाहिजे. राममंदिर व्हावे, ही लोकांची भावना आहे. त्यानुसार मंदिर बांधायला हरकत नाही. कायमचा वाद मिटवायचा असेल, तर मशिदीसाठी त्या ठिकाणी दुसरी जागा देऊन हा वाद सोडवावा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधण्याची घाई करू नये. मुस्लिमांवर दबाव टाकून मंदिर बांधू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: BJP again in 2019 says ramdas athawale