Vidhan Sabha 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर; तावडे, खडसे यांचे नाव नाहीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भाजपच्या उमेदवारांची उत्सुकता लागलेली होती. आज, भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आल्यानंतर दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भाजपच्या उमेदवारांची उत्सुकता लागलेली होती. आज, भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आल्यानंतर दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती या संघटनासह महायुती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. यामध्ये भाजप एकूण 144 जागा लढवणार असून त्यापैकी एकूण 139 जागांवर भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहेत.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP announces second list of 14 candidates for Vidhansabha Election