Vidhan Sabha 2019 : भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंचे नाव नाहीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भाजपच्या तिसऱ्या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. तर, या यादीत मंत्री विनोद तावडे आणि बावनकुळे यांचेही नाव नाही. भाजपने आतापर्यंत एकूण 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भाजपच्या उमेदवारांची उत्सुकता लागलेली होती. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत एकूण 139 जाहीर झाल्यानंतर भाजपकडून आज तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आल्यानंतर दुसऱ्या यादीत 14 उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आज भाजपची चार उमेदवारांची तिसरी यादी आली आहे.

भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपच्या तिसऱ्या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नसल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. तर, या यादीत मंत्री विनोद तावडे आणि बावनकुळे यांचेही नाव नाही. भाजपने आतापर्यंत एकूण 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

भाजपची दुसरी यादी जाहीर

आज भाजपने चार उमेदवारांची जाहीर केलेली यादी-

No photo description available.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP announces third list not include eknath khadse