Ashish Shelar | राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, 'चीन सोडा भोंग्यांचं बोला' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar

राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, 'चीन सोडा भोंग्यांचं बोला'

मुंबई : "मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल, ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा राऊत तुम्ही कुठे होता." अशी बोचरी टीका भाजपाचे आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. (Ashish Shelar Alleges Sanjay Raut)

सध्या राज्यभर चाललेल्या भोंग्याच्या वादावरून राजकारण ढवळून निघालं असून राजकीय आरोप प्रत्यारोप चालू आहेत. त्यामध्ये बाबरीवरूनही राजकारण सुरू असून बाबरी आम्ही पाडली त्यावेळी शिवेसना कुठं होती असा सवाल भाजपाकडून उपस्थित केला जात आहे. (Ashish Shelar News)

हेही वाचा: "शेवटचा एक दिवस बाकी... भोंगे बंद झालेच पाहिजे"; मनसेचा रिमाइंडर

आम्ही बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी कुठं होते? ज्यावेळी विटांचे पूजन केले तेव्हा राऊत तुम्ही कुठे होता? जेव्हा गंगा पूजन होत होते तेव्हा तुम्ही कुठे गोधड्या ओल्या करत होता, मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल असा टोला त्यांनी शिवसेनेला लावला आहे. तसेच काँग्रेस सरकारचे कमिशन होते तेव्हा शिवसेना राममंदिर या विषयात अदखलपत्र होती असं म्हणत हिंदुत्वावरून तुम्ही फाटके आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे.

आम्ही शिवसेना हे फाटकं बनियान आहे असे तुम्हाला म्हणायचे का? असा सवाल करत ही बेडूक उड्या मारणारी शिवसेना आहे असं ते बोलले. शिवसेनेचा देव, देश, धर्म कुठे गेला असा सवाल करत शिवसेनेचा आजचा कार्यक्रम बघायला गेला तर आयत्या बिळात नागोबा अशी आहे. अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा: "अल्टीमेटमवर देश चालत नाही..."

शिवाजी पार्कवर ईद नमाज पडू द्या असे म्हणणाऱ्यावर कारवाई का नाही? संजय राऊत झेंड्याचा कलर बदलायला निघाले का? असे सवाल करत राज्य सरकारला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा आहे असं मला वाटतं, आमच्या दोन पदाधिकाऱ्यांना सरकारने नोटीस दिली आहे. कायद्याचे राज्य आहे का? तुमच्या घरात बसून कायदे होत नाही असं ते बोलताना म्हणाले.

राज्य सरकार शरद पवार यांच्या इशारावर चालतंय, अजित पवारांनी मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते हे मान्य केलंय तर मग त्यांनी आता सुपारीची किंमत किती आहे हे सांगावी. या सरकारच्या विरोधात कुणी बोलला तर ते त्यांना नोटीसा पाठवतात. हे तानाशाहीचे राज्य आहे, वैचारिक स्वातंत्र्य संपले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Bjp Ashish Shelar On Shivsena Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top