शिवभक्तांच्या संतापापुढं भाजप नमले; वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचे आदेश?

book
book

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून देशभरात आंदोलने सुरू झाल्यानंतर आज, भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश लेखकांना दिले आहेत. लेखक जयभगवान गोयल यांना पुस्तक मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती, भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिल्याची  माहिती टीव्ही 9 या वाहिनीने दिली आहे. शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, अशी भावना व्यक्त करत, महाराष्ट्रातून काल पासून या पुस्तकाला विरोध संतापाची लाट उसळली होती. त्याची दखल भाजपला घ्यावी लागली. पण, जयभगवान गोयल यांनी ताठर भूमिका ठेवत, पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. 

काय घडलं?
नवी दिल्लीत रविवारी भाजप मुख्यालयात आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रकाशन होताच यावर पुस्तकावर सर्वच स्तरांतून कडाडून टीका सुरू झाली. सोशल मीडियात तर, भाजप आणि लेखक जयभगवान गोयल यांना लक्ष्य करण्यात आले. तर, आज, कोल्हापूर, पुणे, मुंबई, हिंगोली, अशा महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी भाजप आणि लेखक गोयल यांच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली. अनेक ठिकाणी गोयल यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले. आज, सकाळपासून या पुस्तकाविरोधात संतापाची लाट तीव्र झाली होती. त्यामुळचं भाजपला याची दखल घ्यावी लागली आणि लेखक गोयल यांनी पुस्तक मागे घेण्याचे आदेश देण्यात आले.

गोयल यांची ताठर भूमिका
भाजपने लेखक गोयल यांना पुस्तक मागे घेण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजप नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी दिली आहे. पण, लेखक जयभगवान गोयल यांनी 'पुस्तक मागे घेण्याचा प्रश्नच नाही,' अशी प्रतिक्रिया मीडियाशी बोलताना दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com