भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु; 'महाजनादेश यात्रा' काढणार

टीम ई-सकाळ
रविवार, 21 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा होईल. एक ऑगस्टपासून मोझरीतून या यात्रेला सुरवात होणार आहे. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 'महाजनादेश यात्रा' काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा होईल. एक ऑगस्टपासून मोझरीतून या यात्रेला सुरवात होणार आहे. 

महाजनादेश यात्रा 25 दिवस चालणार असून, राज्यातील 152 विधानसभा क्षेत्रात निघणार आहे. मुंबई वगळता ग्रामीण भागात ही यात्रा निघणार आहे. या यात्रेनंतर महाराष्ट्र काबीज करण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला आहे.

अशी असेल मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश यात्रा' :

- पहिला टप्पा - मोझरी ते नंदुरबार

- दुसरा टप्पा - अकोले, अहमदनगर, नाशिक 

- 30 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार 

- साडेचार हजार किलोमीटरहून अधिक ही यात्रा असणार. 

- 300 हून अधिक सभा होणार. 

- जाहीर सभा 104,  228 स्वागत सभा ( स्वागत सभेत रथावरून 10 मिनिटं मार्गदर्शन सभा होणार) 

- 'विजय संकल्प सभा'ही होणार. 

- या यात्रेत एक रथ असणार.

- या रथातून मुख्यमंत्री रथामध्ये व्यासपीठ तयार करण्यात येणार.

- एखाद्या ठिकाणी सभा घ्यायची असेल तिथे रथात व्यासपीठ तयार होईल. ज्यात माईकची व्यवस्थाही असेल. 

- एलईडी रथाची व्यवस्थाही करण्यात येणार. 

- प्रत्येक ठिकाणी होणार पत्रकार परिषद. 

- नाशिक तीर्थ क्षेत्रावर होणार समारोप. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP begins preparations for assembly election Mahajandesh Yatra will be Start soon