"Who is Dhangekar?" चंद्रकांत पाटलांचा 'तो' व्हिडिओ पुन्हा चर्चेत

रविंद्र धंगेकर यांचा कसबा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.
Viral Video
Viral Video Sakal

पुणे : कसबा येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाने एवढा प्रचार करूनही त्याचा फायदा झाला नाही. तर चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
Salesman Viral Video: सेल्समनने दुकानातच दाखवली साडी नेसून; महिलाही लाजल्या, Video होतोय व्हायरल

दरम्यान, या पोटनिवडणुकीचा प्रचार करताना चंद्रकांत पाटील हे "Who is Dhangekar?" मी बऱ्याच दिवसांपासून धंगेकरांचं नाव ऐकतोय.. पण हा धंगेकर कोण आहे" असं ते भर सभेत म्हणाले होते. त्यानंतर आता भाजपच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाल्याने आता चंद्रकांत पाटील यांना ट्रोल केलं जात आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली होती. तर चिंचवड येथे शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि भाजपच्या आश्विनी जगताप या उमेदवारांमध्ये लढत झाली. त्याचबरोबर कसब्यामध्ये रविंद्र धंगेकर विरूद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com