Devendra Fadnavis : तुम्ही फडणवीसांबद्दल न बोललेलंच बरं; चित्रा वाघांचे ठाकरे गटाच्या खासदाराला चोख प्रत्युत्तर

bjp chitra wagh on mp priyanka chaturvedi demand resignation of devendra fadnavis amruta fadnavis blackmail case
bjp chitra wagh on mp priyanka chaturvedi demand resignation of devendra fadnavis amruta fadnavis blackmail case esakal

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण चांगलेच तापताना दिसत आहे. या प्रकरणात आता उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी फडणवीस यांनी गृहमंत्रीपदावरून बाजुला व्हावे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यावरून आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी प्रियंका चतुर्वेदी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, "प्रियंका चतुर्वेदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कालचे निवेदन पूर्ण ऐकले असते तर त्यांना इतके प्रश्न पडले नसते.पोलिसांनी FIR दाखल केल्यावर अवघ्या 48 तासात तो न्यायालयाला पाठविला. त्यामुळे लपवून ठेवण्यासारखे काहीच नव्हते.

"ज्यांचे मंत्री अगदी दाऊद इब्राहिमशी संबंध असताना जेलमध्ये गेले, तरीही राजीनामा घेण्याची हिंमत झाली नाही, त्यांनी काही नसताना आणि स्वतः अमृता फडणवीस यांनी तक्रार केलेली असताना राजीनामा मागणे, हे निव्वळ अत्यंत हास्यास्पद आहे", असेही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

"तसेही केवळ खासदारकीसाठी ज्यांनी उडी मारली त्यांनी देवेंद्र फडणवीस जे राजकारणात सर्वाधिक साधनशुचीता पाळतात, त्यांच्यावर न बोललेलेच बरे..!" असा टोला देखील यावेळी चित्रा वाघ यांनी चतुर्वेदी यांनी लगावला आहे.

bjp chitra wagh on mp priyanka chaturvedi demand resignation of devendra fadnavis amruta fadnavis blackmail case
Anil Jaisinghani : फडणवीसांनी विधानसभेत नाव घेतलं तो अनिल जयसिंघानी आहे तरी कोण? जाणून घ्या प्रकरण

प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या होत्या?

या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करत आहेत. या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल झाली आहे. पण अनिक्षाला आताच का अटक केलं. मुंबई पोलिस गृहमंत्र्यांनाच रिपोर्ट करतात. ही घटना गृहमंत्र्यांच्या घरी घडली. हायकोर्ट असो वा सुप्रीम कोर्ट प्रकरणाची त्यांचा कुठेही संबंध असला तर ते बाजुला होतात. पारदर्शकता राहते. इथं तुम्हीच गृहमंत्री, तुम्हालाच व्हिडीओ दिला जातो. तुम्हीच त्या व्हिडीओला क्लिनचीट देतात.

bjp chitra wagh on mp priyanka chaturvedi demand resignation of devendra fadnavis amruta fadnavis blackmail case
Toyota Hilux Price Cut : कमी झाली टोयोटा हिलक्सची किंमत! संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

या प्रकरणात ब्लॅकमेलिंग कशासंदर्भात होतय? हे स्पष्ट व्हायला हवं. २०१६ मध्ये हेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. तरी देखील देशातील सर्वात मोठ्या बुकीला यांच्या घरी कसाकाय ऍक्सेस होता, असा प्रश्नही चतुर्वेदी यांनी उपस्थित केला.

आता तर ती आरोपी डिझाईनर नसल्याच समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, त्यामुळे फडणवीसांनी गृहमंत्रीपदावरून बाजुला व्हावं, अशी मागणीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com