
Chitra Wagh News : 'शितल… तू लढ आम्ही तुझ्यासोबत; या हरामखोरांना…'; 'त्या' व्हिडीओवर चित्रा वाघ भडकल्या
शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटातील नेत्यांवर केला जात आहे. याप्रकरणात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाहीचं. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाच, पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा, असे अवाहन चित्रा वाघ यांनी केले आहे.
राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा प्रकारे त्रास दिला जातो हे आपण पाहिलंच आहे, पण आता विकृतीने कळस गाठला आहे. आज सकाळी शितल म्हात्रे आणि प्रकाशदादा सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाहण्यात आला.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, एखाद्या बाईला थांबवता येत नाही, तेव्हा तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवले जातात. तिच्यावर बोललं जातं.तिच्याविरोधात असे विकृत व्हिडीओ बनवून बदनामी केली जाते. हा प्रश्न एकट्या शितल म्हत्रेचा नाहीये. तिच्यासारख्या हजारो महिला राजकारणात काम करतो, आज तिचा नंबर आहे उद्या आमच्यापैकी कुणाचा लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा लढा सगळ्यानी मिळून लढला पाहिजे. उद्धव ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक झाली आहे. कुणी त्यांना हे करायला सांगितलं ते शोधून काढलं पाहिजे असेही चित्रा वाघ म्हणाल्या.