Pooja Chavan suicide case: मला शिकवू नका..जावा इथून; का भडकल्या चित्रा वाघ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

Pooja Chavan suicide case: मला शिकवू नका..जावा इथून; का भडकल्या चित्रा वाघ?

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ सध्या यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तिथ पत्रकार परिषद घेतली. मात्र, या परिषदेमध्ये पत्रकार आणि चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी झाली असल्याची पाहायला मिळाली. (BJP Chitra Wagh Police gave Sanjay Rathod clean chit in Pooja Chavan suicide case )

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.

पत्रकाराच्या या प्रश्नाला उत्तर देताना चित्रा वाघ यांना राग अनावर झाला. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.

तसेच, तुम्ही संजय राठोड यांच्याकडून सुपारी घेतली काय, असा प्रतिप्रश्न करत मला तुम्ही शिकवु नका. इथून जावा अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून पत्रकारांना बाहेर काढले.

तसेच, संजय राठोड यांच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण व परिवाराने खूप त्रास सहन केला, असे वाघ म्हणाल्या. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वादानंतर पत्रकारांनी वाघ यांचा निषेध नोंदवून सर्व पत्रकार पत्रपरिषदेतून बाहेर पडले.

टॅग्स :Chitra Wagh