"गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं", उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर | Urfi Javed Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp chitra wagh replied to ncp supriya sule over rupali chakankar in urfi javed controversy

Urfi Javed Controversy: "गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं", उर्फी प्रकरणी चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे.चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं त्यानंतर महिला आयोगापाठोपाठ चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना ही विकृती हद्दपार करण्यावरून टीका केली आहे.

चार भिंतीच्या आत तुम्ही काय करता हा तुमचा प्रश्न आहे, पण सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला कपड्यांचे भान असणे गरजेचे आहे, मुली जीन्स, टॉप, फ्रॉक आणि स्कर्ट घालतात, त्या उघड्या-नागड्या फिरत नाहीत. ते कपडे आणि ही बाई जो नंगानाच करतेय यात फरक आहे. फॅशन आणि नंगानाच यामध्ये फरक आहे की नाही?

रस्त्यावर येऊन लोकांना चेकाळवायचं काम चालू आहे असे चित्रा वाघ म्हणाल्या. पोलिस त्यांचं काम करतील, सरकार सरकारचं काम करेल आम्ही आमचं काम करू.. ऐकलं तर ठिक आहे, नाही ऐकलं तर काय करणार ते सांगितलं आहे असेही वाघ म्हणाल्या.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. चाकणकरताई तुमचा अभ्यास किती आहे, तो पेपर तुम्ही सुप्रियाताईंच्या समोर सोडवा. आम्हाला सांगायची गरज नाहीये. तुमचा अभ्यास बघून तुमच्या पक्षाने तिथं बसवलं नाहीये. तुमचा अभ्यास किती आहे ते सुप्रिया सुळे यांना जाऊन सांगा. आमचा अभ्यास पक्का आहे. तुम्ही नोटीस पाठवली आम्ही उत्तर पाठवलं आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

सल्ले तुमच्या घरात द्या... समाजस्वस्थ्याचं कारण असतं तिथं राजकारण करायची गरज नसते. जे राजकारण करण्यासाठी उड्या मारतायत त्यांना आम्ही गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. त्यांच्या नेत्या ( सुप्रिया सुळे) सांगतयतं हे थांबवा…सुप्रियाताई ही विकृती थांबवण्यासाठी आम्ही लढा सुरू केला आहे.

वाईट याचं वाटतं तुम्ही ज्या बाईला बसवलं आहे तिला यामध्ये विकृती दिसत नाही.त्यामुळे तुम्हाला सल्ले द्यायचे असतील तर तुमच्या घरात द्या आमच्या घरात द्यायची गरज नाही असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

उर्फी प्रकरणत होत असलेल्या राजकारणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली होती. राजकारणात सुरू असलेल्या गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा मी माझ्या पक्षापासून सुरूवात करते, अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे. महिलांना माते समान सन्मान आहे तिथे हे घडतंय हे दुर्दैवी आहे अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती.

अभिनेत्री उर्फी जावेद व भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील आरोप- प्रत्यारोप वाढत असून ते थांबले पाहीजेत. ते थांबविण्याची सुरवात आम्ही आमच्यापासून पक्षापासून करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी करीत हे गलिच्छ राजकारण थांबवाव अशी मागणी केली होती.