भाजप, काँग्रेसला संमिश्र यश

भाजप, काँग्रेसला संमिश्र यश

मुंबई -  राज्यातील पाच नगर परिषदांचा निकाल लागला असून, यामध्ये विदर्भात दोन नगर परिषदेवर भाजपने, पश्‍चिम महाराष्ट्रात दोन ठिकाणी काँग्रेसने, तर कोकणात शिवसेनेने एका ठिकाणी आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे.

पाच नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक भाजपचे ३९ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, तर शिवसेनेचे ७ सदस्य निवडून आले आहेत. विदर्भात नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर परिषदेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवाराची निवड नगराध्यक्षपदी झाली आहे; तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे भाजपला नगराध्यक्ष पद मिळाले. आदिवासीबहुल भागात भाजपची मते वाढल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर परिषदेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने एकहाती सत्ता काबीज करत नगराध्यक्षपद पटकावले आहे, तर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाने सत्ता हस्तगत केली आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात मागील पंधरा वर्षांपासून असलेली कर्जत नगरपालिकेवरील आमदार सुरेश लाड यांची सत्ता शिवसेनेने काबीज केली असून, शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी झाला आहे. 

असे निकाल
कर्जत (रायगड)
नगराध्यक्ष : शिवसेना, 
सदस्य : भाजप-४, शिवसेना-६, राष्ट्रवादी काँग्रेस-८, काँग्रेस-०, 

मलकापूर (सातारा)
नगराध्यक्ष : काँग्रेस, 
सदस्य : भाजप- ५, शिवसेना-०, राष्ट्रवादी काँग्रेस-०, काँग्रेस- १४, 

श्रीगोंदा (नगर)
नगराध्यक्ष : काँग्रेस, 
सदस्य : भाजप-११, शिवसेना-०, राष्ट्रवादी काँग्रेस-२, काँग्रेस-६ 

महादूला (नागपूर)
नगराध्यक्ष : भाजप, 
सदस्य : भाजप-११, शिवसेना-०, राष्ट्रवादी काँग्रेस-०, काँग्रेस-४ 

आरमोरी (गडचिरोली)
नगराध्यक्ष : भाजप, 
सदस्य : भाजप-८, शिवसेना- १, राष्ट्रवादी काँग्रेस-०, काँग्रेस-६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com