
शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? भाजपचा सवाल
शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? अशा सवाल भाजपने ट्विट करत राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे. तसेच एक स्क्रिनशॉट शेअरदेखील केला आहे. (BJP criticism on i will not call the city chhatrapati sambhaji nagar sharad pawar)
मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा तुम्ही अपमान करता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? अशा आशयाचे ट्विट भाजपने केला आहे. त्यांच्या या प्रश्नाला शरद पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर ...
मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं विधान शरद पवारांनी केले. पवार छत्रपती संभाजी नगर येथील सौहार्द या कार्यक्रमात बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या प्रवासाच्या आठवणी काढत असतांना त्यांनी हे विधान केलं असल्याचे न्यूज़ 18 lokmat ने बातमी दिली आहे.
माझ्या एका सहकाऱ्याच्या इच्छेनुसार समृद्धी महामार्गावरून औरंगाबादला आलो आहे. संभाजीनगर म्हणतो, मला वाद वाढवायचा नाही. असं खोचक वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
अहमदनगरपाठोपाठ कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला. राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे.
शिवराज्यभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय. तर दोन दिवसांपूर्वी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता.