भाजप काही विद्यमान आमदारांचे पत्ते कापणार; महाजन यांचे सूतोवाच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 June 2019

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांची उमेदवारी कापली जाणार आहे. असे संकेत जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिले.

नाशिक ः दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांची उमेदवारी कापली जाणार आहे. असे संकेत जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिले. यानंतर भाजपमधील इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे शहरात कुणाची उमेदवारी कापली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकला भाजप महिला प्रदेश मोर्चाच्या बैठकीच्या निमित्ताने आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शहराध्यक्ष बदलांच्या अनुषंगाने भाजपमध्ये "एक व्यक्ती एक पद' हा फॉर्म्युला राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

म्हणून, भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या पदावर पहिली कुऱ्हाड पडणार याचे स्पष्ट संकेत मिळाले. त्यामुळेच सानप यांना शहराध्यक्ष किंवा आमदारकी यापैकी एका पदावर पाणी सोडावे लागणार, याचे आडाखे सुरू झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP cuts some existing MLAs Ticket in Vidhansabha Election