"राहुल गांधीची खासदारकी रद्द करून भाजपचा मोदींना दिलासा" राष्ट्रवादीच्या नेत्याचं खबळजनक ट्विट Rahul Gandhi Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Rahul Gandhi News Updates
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi defamation case
Rahul Gandhi protest
Rahul Gandhi disqualified 
Rahul Gandhi MP Status

"राहुल गांधीची खासदारकी रद्द करून भाजपचा मोदींना दिलासा" राष्ट्रवादीच्या नेत्याचं खबळजनक ट्विट Rahul Gandhi Latest News

मोदींच्या आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने गुरूवारी दोषी ठरवले आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी (२४ मार्च) संपुष्टात आले.

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सुरत न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेनंतर वायनाडच्या खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशात खळबळ उडाली आहे.

मात्र या निर्णयावर राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, राहुल गांधी यांनी संसदेत मांडलेल्या एकाही मुद्द्याचे उत्तर देण्यास नरेंद्र मोदी अपयशी ठरलेत.

सभांमध्ये मोठमोठ्याने ओरडणारे मोदी संसदेत मूग गिळून बसलेले आपण बघितले आहेत. मोदींच्या प्रतिमेच्या अशा चिंध्या होत असल्याने राहुल गांधीची खासदारकी रद्द करून भाजपने मोदींना दिलासा दिला" त्यामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुरुवार, 23 मार्च रोजी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना 15,000 रुपयांच्या दंडासह दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र, राहुल गांधींना लगेच जामीन मंजूर करण्यात आला. संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता राहुल गांधींना बंगला रिकामा करावा लागणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :BjpNCP