‘केंद्रात पुन्हा भाजपच’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

भुसावळ - लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ येथे झालेल्या पक्षाचे बूथ व केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. 

खडसे म्हणाले, तुमचे सरकार येणार का? असे विचारल्यास काँग्रेसवाले नाही म्हणतात. भाजपला समर्थ पर्याय निर्माण होणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळेच सध्या भाजपला अपराध्याच्या चौकटीत उभे करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. भाजप व शिवसेनेची युती होईल की नाही, यावर चर्चा सुरू आहे. मात्र, युती झाली नाही तरीही भाजपला दीडशे जागांवर विजय मिळेल. कर्जमाफीमध्ये गैरव्यवहार आहे, असे शिवसेनेला वाटत असेल तर तसा विरोध त्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणे गरजेचे आहे. मात्र, कॅबिनेटच्या बैठकीत ते मंजुरी देतात आणि बाहेर जनतेसमोर वेगळेच सांगतात, हे योग्य नाही., असे खडसे यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP government will again come to power Lok Sabha in 2019 says eknath khadse