सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी निवडीनंतर भाजपनं अजित पवारांना डिवचलं! : BJP Reaction on NCP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar_Ajit Pawar_SupriyaSule

BJP Reaction on NCP: सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी निवडीनंतर भाजपनं अजित पवारांना डिवचलं!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. यामुळं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. हा राष्ट्रवादीचा पक्षांतर्गत विषय असला तरी भाजपनं यावरुन अजित पवारांना डिवचलं आहे. (BJP has criticized Ajit Pawar after elected of Supriya Sule as working president)

राष्ट्रवादीतील या बदलावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा दरेकर म्हणाले, "हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे की त्यांनी कोणाला कार्याध्यक्ष करायचं किंवा नाही. पण शरद पवारांना सुप्रिया सुळेंनाच गेल्यावेळी अध्यक्ष करायचं असेल. त्याचवेळी त्यांना भाकरी फिरवायची होती पण भाकरी तिथंच राहिली. (Marathi Tajya Batmya)

पण आता सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करुन महाराष्ट्राची जबाबदारी दिली असेल तर अजित दादांची नेमकी भूमिका काय? हे स्पष्ट नाही. म्हणजे पडद्यामागून सुप्रिया ताईच सर्व सुत्रे हालवत होत्या. पण आता अधिकृतरित्या शरद पवारांनी आपला वारसदार नेमला की काय? आणि अजित पवारांना योग्य संदेश दिला अशी शंका यामागे घ्यायला वाव आहे, असं यावेळी प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.