Sushma Andhare : भाजपचं हिंदुत्व दंगली घडवणारं ; सुषमा अंधारे यांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare : भाजपचं हिंदुत्व दंगली घडवणारं ; सुषमा अंधारे यांचा आरोप

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली. भाजपमध्ये नैतिकता राहीली नाही. भाजपच्या जाळ्यात आमचे ४० भाऊ अडकले आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज बीडमध्ये सुरु असून या ठिकाणी या यात्रेचा समारोप आहे. यात्रेनंतर झालेल्या सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषण झालं. 

सुषमा अंधारे यांनी महागाईवर मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे काही जुने व्हिडिओ दाखवले. महागाईवर प्रश्न विचारले तर ते म्हणतात हिंदू खतरेमे है!, असे अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या,  तुम्ही कसले हिंदुत्वाचे पाईक, तुमचं हिंदुत्व दंगली घडवणारे आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. हिंदू म्हणणारे लोक पळून जात नसतात. ४० लोक कुटुंब सोडून पळून गेले."

आमचे ४० भाऊ अडकलेले आहेत -

अंधारे म्हणाल्या "त्या कळसुत्री बाहुल्यांच्या खेळात आमचे ४० भाऊ अडकलेले आहेत. भाजपनं मेटेंचा वापर करुन घेतला मात्र त्यांच्या शिवसंग्राम सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. भाजपची ही नेहमीची नीती आहे. कारण भाजपनं रासपचे महादेव जानकर यांचाही वापर करुन घेतला त्यांचा वापर करुन टाकून दिलं. त्यानंतर त्यांनी सदाभाऊ खोत यांना पुढे आणलं आता ते कुठे आहेत? सदाभाऊ म्हणतात भाजपनं आपलं आता काय ठेवलं आहे, आता म्हशीचं दूध काढायचं आणि सोडून द्यायचं"