शिवसेना सोबत न आल्यास स्वबळावर लढून जिंकू: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

खडसेंना मंचावर स्थान
खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांच्या या एकत्रित बैठकीसाठी उभारलेल्या मंचावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विराजमान झाल्या होत्या. माजी महसूलमंत्री आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांना आग्रहाने मंचावर स्थान देण्यात आले होते.

मुंबई - भाजपच्या तीन हिंदी भाषक राज्यांत कॉंग्रेस जिंकून आली आहे. या ठिकाणी भाजपच्या झालेल्या पराभवामुळे खचून न जाता येणारी निवडणूक जिंकण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार व जिल्हाध्यक्षांना दिला. 

निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत आली तर आनंदच आहे; मात्र न आल्यास स्वबळावर लढून जिंकण्याचा आत्मविश्‍वासही आमदारांमध्ये चेतवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

हिंदी भाषक पट्ट्यातील पराभव, तसेच शिवसेनेने सातत्याने सुरू ठेवलेली टीका, या पार्श्‍वभूमीवर भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. ही पूर्वनियोजित बैठक राज्यातील आमदारांना दिलासा देण्यासाठी, तसेच आगामी नियोजनासाठी होती, असे सांगण्यात आले.

खडसेंना मंचावर स्थान
खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांच्या या एकत्रित बैठकीसाठी उभारलेल्या मंचावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विराजमान झाल्या होत्या. माजी महसूलमंत्री आणि नाराज नेते एकनाथ खडसे यांना आग्रहाने मंचावर स्थान देण्यात आले होते.

Web Title: BJP Independent Election Politics Devendra Fadnavis