
Maharashtra Politics : कोल्हापूरची जागा कोणाच्या कुंडलीत लवकरच कळेल! भाजपच्या सिंधीयांचा शिंदे सेनेवर निशाणा?
लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये हलचालींना सध्या वेग आला आहे. जागावाटप कसं होणार यावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यादरम्यान कोल्हापूर मधील लोकसभेच्या दोन जागा भाजपकडे जाणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहाणार यावर अद्याप निर्णय झाला नाही. मात्र या जागांबद्दल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
कोल्हापूरातील लोकसभेच्या जागेवर सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन खासदार आहेत, त्यामुळे या जागा त्यांच्याकडेच राहाणार की भाजप या जागांवर दावा सांगणार यावरून धुसफूस सुरू आहे.
यादरम्यान ज्योतिरादित्य सिंधीया म्हणाले की, भाजपला स्थानिक पातळीवर मजबूत कराण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. याबद्दलच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी दिले आहेत. तसेच कोणाच्या कुडंलीत काय आहे ते योग्य वेळी कळेत. त्याचं उत्तर वेळच देईल असेही ज्योतिरादित्य सिंधीया म्हणाले आहेत.
कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदार संघात सध्या अनुक्रमे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे शिंदे शिवसेनेचे खासदार आहेत.यादरम्यान कोल्हापूरात भाजप नेत्यांच्या फेऱ्या वाढल्याने या जागा कोणाला मिळणार याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.
यादरम्यान ज्योतिरादित्य सिंधीया यांनी हे दौरे पक्ष वाढीसाठी असून उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नसल्याचे स्पष्ट केलंय. मात्र, ज्याच्या कुंडलीत लिहले आहे त्यालाच उमेदवारी दिली जाईल असेही त्यांनी म्हटलं. त्यामुळे कोल्हापूरात एकनाथ शिंदे यांची चिंता वाढली आहे.