'दुसरी स्क्रीन मलिकांच्या कोठडीतून लावणार का?'

कॅबिनेट बैठकीवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे, म्हणतात..
केशव उपाध्याय
केशव उपाध्यायesakal
Summary

कॅबिनेट बैठकीवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे, म्हणतात..

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. यानंतर राजकीय वर्तुळातील नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. महाविकास आघाडी आणि भाजपाकडूनही एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान, या अटकेनंतर घडामोडींना वेग आला आणि राष्ट्रवादीतील (NCP) नेत्यांनी काल बैठक घेतली. याशिवाय काल वर्षा बंगल्यावरही बैठक घेण्यात आली. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्याय (bjp Keshav Upadhyay) यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. कॅबिनेट बैठकीवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

ट्विटमध्ये ते म्हणाले, अटकेत असलेले नबाब मलिक यांना राजीनामा द्यायची गरज नाही असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावला मग कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) कायमच online असतात. आता काय दुसरी स्क्रीन थेट मलिक यांच्या कोठडीतून लावणार का? असा सवाल उपाध्याय यांनी केला आहे.

केशव उपाध्याय
वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक; नवाब मलिक राजीनामा देणार का?

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) हे मनी लॉंडरिंग अॅक्ट अंतर्गत दोषी ठरले असल्याची माहिती ईडीच्या झोन १ चे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी सांगितली होती. त्यामुळं त्यांच्यावर अॅक्ट अंतर्गत २३ फेब्रुवारी २०२२ ला अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मंत्री मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली होती

केशव उपाध्याय
Nawab Malik | ८ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ED कडून अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com