राज ठाकरेंचं ठीकये पण पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?

'पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं'
politics
politicsesakal
Summary

'पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं'

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गुढीपाडव्याला शिवतीर्थावर केलेल्या भाषणात दरम्यान काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या त्यांच्यावर टीका सुरु आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

politics
लसीकरण झाले असो किंवा नाही, प्रत्येकाला लोकल प्रवास करता येणार

यांसंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, राज ठाकरे रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण मग शरद पवार यांच कय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली. २०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले. बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपासोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?, असा सवाल त्यांनी केला आहे.

politics
आर या पार... राज्य सरकारबाबत राजू शेट्टींचा आज फैसला!

दरम्यान, जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. एखादा सरडा जसा रंग बदलतो तसेच माणसं रंग बदलत आहेत. त्याचाच हा प्रकार आहे, अशी टीका ऊर्जा मंत्री राऊत यांनी केली आहे. शरद पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्याकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. राज ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com