अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते; भाजपचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांच्या गटनेतेपदाचे पत्र राजभवनात आहे. अजित पवारांनी केलेल्या दाव्याचा प्रतिदावा म्हणून जयंत पाटलांनी दिलेले पत्र आहे. जयंत पाटलांसाठी फक्त पत्र दिले त्याची नोंद नाही. राज्यपालांच्या लेखी अजित पवारच गटनेते आहेत.

मुंबई : जयंत पाटील यांची गटनेतेपदी नोंद झालेली नाही. त्यामुळे अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत, असे भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोचला असतानाच अजित पवारांच्या साथीने सत्तेत सहभागी झालेल्या भाजपला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हे जयंत पाटीलच असतील, त्यामुळे तेच व्हिप बजावू शकतील असे स्पष्ट झाले आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, की विधिमंडळात सचिवालयात राष्ट्रवादी पक्षाचे विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील यांची अधिकृत नोंद झाली आहे. राष्ट्रवादीने जयंत पाटलांच्या निवडचे अधिकृत पत्र सोमवारी आम्हाला दिले आहे. 

भाजपला मोठा झटका; जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते

यानंतर भाजपने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की अजित पवार यांच्या गटनेतेपदाचे पत्र राजभवनात आहे. अजित पवारांनी केलेल्या दाव्याचा प्रतिदावा म्हणून जयंत पाटलांनी दिलेले पत्र आहे. जयंत पाटलांसाठी फक्त पत्र दिले त्याची नोंद नाही. राज्यपालांच्या लेखी अजित पवारच गटनेते आहेत. जयंत पाटील यांची गटनेते म्हणून नोंदणी नाही. आता निर्णय मावळते विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे.

अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar claims Ajit Pawar is NCP legislative party leader