Ashish Shelar:ठाकरे गटाला कोणतीच संवैधानिक मान्यता नाही; विधान परिषदेतल्या पेचावर शेलारांचं भाष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashish shelar news

Ashish Shelar: ठाकरे गटाला कोणतीच संवैधानिक मान्यता नाही; विधान परिषदेतल्या पेचावर शेलारांचं भाष्य

मुंबईः विधान परिषदेतल्या प्रतोद निवडीसाठी ठाकरे गटाने विलास पोतनिस यांचं नाव सुचवलेलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही नावासंदर्भात एक पत्र विधान परिषद उपसभापतींना दिलेलं आहे. ठाकरे गटाचं संख्याबळ परिषदेमध्ये जास्त आहे. असा पेचप्रसंग असतांना आशिष शेलारांनी मात्र ठाकरे गटाच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्न उपस्थित केलाय.

आज माध्यमांशी बोलतांना आशिष शेलार म्हणाले की, विधान परिषदेमध्ये मुख्य प्रतोदपदासाठी ठाकरे गटाने पत्र दिलं असलं तरी त्यांना कुठलीच मान्यता नाही. ठाकरे गट नेमका कुठून आलाय? या गटाला विधान परिषद, विधानसभा, न्यायालय, निवडणूक आयोग कुणाचीच मान्यता नाही. त्यामुळे त्यांच्या गटाला अर्थ नाही, असं शेलार म्हणाले.

विधान परिषदेतील प्रतोद पदासाठी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांचं नाव उपसभापतींना पाठवण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये विलास पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याची माहिती असून उपनेते पदासाठी सचिन अहिर यांचं नाव उपसभापतींकडे देण्यात आलेलं आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाने विधान परिषद प्रतोद पदासाठी विप्लव बदोरिया यांचं नाव उपसभापतींना सुचवलं आहे. विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचं संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे उपसभापती शिवसेना म्हणून कोणात्या गटाला प्रतोद देणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. ज्या गटाचा प्रतोद होईल, त्यांचा व्हिप शिवसेनेच्या आमदारांना पाळावा लागेल.