राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती वैध : शेलार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

बहुमत चाचणीत आम्हीच बहुमत सिद्ध करू. फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येईल. महाराष्ट्रातील सर्व घटकांची सेवा करण्याचे काम हे सराकर करेल.

मुंबई : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती वैध असल्याचे आम्ही म्हणत होते. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांचाच व्हिप योग्य असेल आणि तो पक्षाला पाळावा लागेल, असे भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (रविवार) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा दिला आहे. उद्या पुन्हा या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. यावर आशीष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी

शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

शेलार म्हणाले, की बहुमत चाचणीत आम्हीच बहुमत सिद्ध करू. फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येईल. महाराष्ट्रातील सर्व घटकांची सेवा करण्याचे काम हे सराकर करेल. सर्वोच्च न्यायालयाने आज घेतलेल्या निर्णयावरून आमचेच सरकार येणार हे स्पष्ट होईल. शिवसेना तोंडावर आपटली त्यांचा कार्यक्रम आटोपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आज मतदान घ्यावं हि मागणी फेटाळली आहे. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत.

अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Ashish Shelar talked about supreme court decision for government in Maharashtra