चंद्रकांतदादा शुक्रवारी सांगत होते 'आपलं जमतय"

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

आपलं जमणार, दादांच्या या वाक्यावर नेत्यांना हसावं की रडावं हे कळत नव्हतं. दादा उगी उगी काहीतरी सांगत असावेत, असा सगळ्यांचा अंदाज होता. माध्यमांशी अनौपचारिक चर्चमध्ये ही सांगलीचे नेते असंच सांगत होते. आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीतील एका गटाचे मिळून सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांना कळून चुकलं.

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. सांगलीतील आमदार, माजी आमदार आणि प्रमुख नेते दादांना विचारत होते, "दादा राज्यात कसं होणार?"

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्या साऱ्यांना दादा सांगत होते, "आपलं सरकार येणार."

आपलं जमणार, दादांच्या या वाक्यावर नेत्यांना हसावं की रडावं हे कळत नव्हतं. दादा उगी उगी काहीतरी सांगत असावेत, असा सगळ्यांचा अंदाज होता. माध्यमांशी अनौपचारिक चर्चमध्ये ही सांगलीचे नेते असंच सांगत होते. आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीतील एका गटाचे मिळून सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र भाजपच्या नेत्यांना कळून चुकलं. चंद्रकांत दादा काल जे सांगत होते ते खरं होतं. आणि आपलं सरकार आता आलेला आहे, त्यानंतर भाजपने फटाके वाजवून जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या पुनर्बांधणी बाबत जिल्ह्यातील प्रमुख नेते आमदार माजी आमदार यांच्याशी सुमारे साडेसात तास चर्चा केली. वन-टू-वन चर्चेमध्ये त्यांनी पक्षाच्या बांधणीबाबत मते जाणून घेतली. त्यावेळी मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी बैठक सुरू होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

टीव्हीवर त्याच्या बातम्या झळकत होत्या. अशा वेळी भाजप सत्तेतून बाहेर राहणार, या दुःखाने व्यथित असणारे भाजपचे सर्व नेते चंद्रकांत दादांकडे ती सल बोलून दाखवत होते. दादा आता कसं होणार, असे विचारत होते. त्यावर दादांनी  आपलं जमतय, काळजी करू नका, असं आश्वस्त केलं. त्यावर भाजपच्या सांगलीतील नेत्यांना हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. दादा म्हणतायेत त्याचा अर्थ कसा काढायचा या गोंधळात नेते दिसत होते. दादांच्या या वक्तव्याकडे इथले नेते पहात होते. एकमेकांमध्ये चर्चा करत होते. रात्री सार्‍यांनी आपलं सरकार गेलं आणि नवीन सरकार येणार, अशा अंदाजात घर गाठलं. सकाळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदाचा स्वीकार कारण केला आहे का, याच्या उत्सुकतेपोटी लोकांनी टीव्ही लावला तर प्रत्यक्षात मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. हा भाजपसाठी ही सुखद धक्का होता. त्याचा आनंद व्यक्त करत सांगली शहरासह जिल्ह्यात गावोगावी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chandrakant Patil hints governmen formation in Maharashtra