esakal | ओबीसींसाठी PM मोदींनी इतिहासात जे झालं नव्हतं ते केलं- फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

ओबीसींसाठी PM मोदींनी इतिहासात जे झालं नव्हतं ते केलं- फडणवीस

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, 'देशाच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांना कोणी मंत्री केलं असेल तर ते पंतप्रधान मोदी यांनी. बहुजनांचं राज्य आलं आहे. मंत्रिमंडळाकडे पाहिलं तर ते दिसून येतं. सामान्य घरातील व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळालं आहे. ओबीसीचा खरा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे, हे अधोरेखित झालं आहे. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात पहिला निर्णय ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचा घेतला. केंद्र सरकारने ओबीसींसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होत आहे.'ओबीसी मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्राच्या सरकारनेही पहिल्यांदाच ओबीसी मंत्रालय तयार केलं. ओबीसींच्या विकासासाठी मोठा निधी दिला. सर्वांना सोबत घेऊन पुढे गेल्याशिवाय विकास होत नाही. पण, सद्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा झालाय. अशात महाविकास आघाडीचं सरकार खोटं बोल पण रेटून बोलच्या भूमिकेत आहे. महाविकास आघाडीने नेते नाही तर पोपट जास्त बोलत आहेत. नेत्यांच्या आरक्षणामुळे आरक्षण गेलं त्यामुळे ते बोलत नाहीत, पण काही बोलके पोपट काहीही बोलत असतात, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: मुंबईत सध्या ALL Ok, जाणून घ्या लोकलच्या updates

5 जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांच्या जास्तीच्या आरक्षणाची केस होती. त्यावेळी आपण 50 टक्क्यांचे आरक्षण वाचवण्यासाठी अभ्यास केला आणि कोर्टाकडून मंजुरी घेतली, पण महाविकास आघाडीच सरकारला जे आहे ते टिकवता आलं नाही. आघाडीला राज्य मागासवर्ग गठीत करायचा होता आणि इम्पिरियल डेटा जमा करण्यासंबंधात परिपत्रक काढायचं होतं. हे सर्व सर्वोच्च न्यायालयात सबमिट करायचं होतं, कोर्टाने याला स्टे दिला असता. पण, महाविकास आघाडीने अशाप्रकारचं काहीही केलं नाही. सातवेळा तारखा घेतल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या चुकीमुळेच ओबीसी आरक्षण गेलं. सरकारच्या नाकर्तेपणामुळे कुठेही आता ओबीसीसाठी जागा आरक्षण नाही. ओबीसी आरक्षण संपवण्याचं काम सरकारने केले, अशी टीका त्यांनी केली.

loading image