घाणेरड्या राजकारणाचा विट आलाय : खडसे

घाणेरड्या राजकारणाचा विट आलाय : खडसे

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. ''घाणेरड्या राजकारणाचा मला विट आला आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल त्यादृष्टीने काम करण्याची तयारी आहे'', असे खडसे म्हणाले. तसेच ''शनिची साडेसाती आहे. पण शनि कोण आहे हे मला चांगलेच माहिती आहे'', असेही ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ''या देशात नरेंद्र मोदींचे सरकार यावे, यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीकडे आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या अधिकाधिक जागा याव्यात यासाठी आम्ही तयारी करत आहोत. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. मात्र, पक्ष जो निर्णय घेईल त्यादृष्टीने काम करण्याची तयारी आहे''. तसेच ते पुढे म्हणाले, ''रक्षा खडसेंनी चांगले काम केले. त्याचा चांगला संपर्क आहे. पक्ष निर्णय घेईल. तो मान्य असेल. रक्षा खडसेंना तिकिट दिल्यास त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे''.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभेसाठी खूप वेळ आहे. तीही जिंकण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. विधानसभेबाबत सध्या मी निर्णय घेतला नाही. निवडणुकीच्यावेळी याबाबत निर्णय घेईन. 

घाणेरड्या राजकारणाचा विट

गेल्या 3 वर्षांचा राजकारणातील माझा अनुभव क्लेशदायक होता. पक्षाच्या विस्तारासाठी योगदान दिले. कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, कोणतेही कारण नसताना आरोप करण्यात आले. मी राजकारणात 40 वर्षे योगदान दिले. चूक नसताना माझ्यावर आरोप झाले. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले.

शनि कोण आहे हे मला माहितेय

विनाकारण आरोप करण्यात आले, आक्षेप घेण्यात आले. खोटे आरोप करण्यात आले. हे फक्त माझ्या वाट्याला आले. शनिची साडेसाती आहे. पण शनि कोण आहे हे मला चांगलेच माहिती आहे. शनिमहाराजांचा कोप झाला. त्याचा अनुभव मी घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com