मैत्रीचा संदेश घेऊन भाजप नेते जाणार मातोश्रीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - शिवसेना आणि भाजप यांच्यातील अभिन्न मैत्रीचा पुन्हा एकदा जागर होऊ द्या, हा संदेश घेऊन भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातोश्रीवर दाखल होणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्‍मी ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी हा मुहूर्त निवडला असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. शिवसेनेशी उत्तम संबंध असलेल्या पाटील यांच्याबरोबरच शिवसेना आणि भाजपमध्ये अमर प्रेम असल्याची ग्वाही देणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शांतिदूताची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते. अर्थात सामोपचाराने मैत्रीपूर्ण वागा हे सांगणारा हा शेवटचा प्रयत्न असेल, असेही भाजपतर्फे स्पष्ट करण्यात येते आहे.
Web Title: bjp leader friendship message give to matoshri