गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिल्यानंतर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी दिली होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाविरुद्ध अचानक बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली. आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

हा सगळा प्रकार जेव्हा घडला, तेव्हा अर्धा महाराष्ट्र पुरता जागा झाला नव्हता. आश्चर्याचा धक्का बसल्याने गोंधळलेल्या अनेक नेत्यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया दिल्या. अजित पवार यांनी ज्यांचा विक्रमी पराभव केला, ते भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.

- Breaking : अजित पवार म्हणतात, 'मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते'

पडळकर म्हणाले, ''अजित पवार यांना भाजपने उपमुख्यमंत्री पद बहाल केले. आणि त्यांनी या पदाची शपथ घेतल्याचे वृत्त समजताच मला सुखद धक्का बसला.''

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये राज्याचा उत्तम कारभार केला आहे. तर अजित पवार यांनी या अगोदर उपमुख्यमंत्रीपद भूषवलं असल्याने त्यांच्याकडे मोठा अनुभवदेखील आहे. भाजपने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देत महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे भाजपसोबत आल्याने राज्यात आता स्थिर सरकार येईल. त्यांनी घेतलेला हा निर्णय दूरदृष्टीनेच घेतलेला आहे.  

- अजित पवारांच्या ट्विटला शरद पवारांचे सणसणीत उत्तर; म्हणाले...

शनिवारी सकाळी जेव्हा राजभवनात हा शपथविधी सोहळा झाला तेव्हा मी प्रवासात होतो. भाजप नेते मिलिंद कोरेंनी मला ही माहिती दिली. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे सध्या जनतेत नाराजी आहे. मात्र, जनभावना हळूहळू कमी होतील, असा मला विश्वास आहे. यापुढे पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारून काम करेन, असे पडळकर यांनी स्पष्ट केले.

- NCP आमदारांसोबत 'धनंजय मुंडे' नावाचा जळता निखारा, कोण म्हणतंय हे...

ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या अजित पवारांनी त्यांचे डिपॉजिट जप्त करत राज्यात विक्रमी विजय मिळविला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Gopichand Padalkar comment about deputy CM Ajit Pawar