'वळसे पाटलांनी पवारांच्या सांगण्यावरून मला रोखलं, मी न्यायालयात जाणार'

Kirit-Somaiya
Kirit-Somaiyasakal media

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit somaiya) हे रविवारी सायंकाळी कोल्हापूरला निघाले होते. मात्र, त्यांना कराडमध्ये रोखण्यात आले. त्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पवारांच्या सांगण्यावरून मला बोगस ऑर्डर दाखविली आणि थांबविण्याचा प्रयत्न केला. वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (cm uddhav thackeray) मला बोगस कागदपक्षे दाखविली. त्याविरोधात मी न्यायालयात जाणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

Kirit-Somaiya
किरीट सोमय्या पुन्हा कोल्हापूरला जाणार; पाहा व्हिडिओ

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवार, तसेच त्यांच्या जावयांचा घोटाळा उघडकीस आणणार आहे. आप्पासाहेब नलावडे गडहिंगलज साखर कारखानयात पैसे कसे आलेत याची माहिती मी तपास यंत्रणांना दिली आहे. फ्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफांच कंपनी आहे, तपासाला गती मिळावी म्हणून मी तपास यंत्रणांना पुरावे दिले आहे. आता हसन मुश्रीफांना हजार कोटींचा दावा ठोकायचा असेल तर ठोकू द्या. मी सर्व पुरावे दिले आहेत, असे सोमय्या म्हणाले.

लवकरच मी तिसरा घोटाळाही बाहेर काढणार आहे. मी जे काही करतो ते कायदेशीर करतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर बाकीच्या कारवाईला गती मिळते. हसन मुश्रीफांना काळजी असेल तर त्यांनी मला विचारावं. मला कोण काय पुरवतं याचा तपास त्यांनी करावा. जे मला माहिती देतात त्यांना मी समोर आणणार नाही. एका तपास यंत्रणेचे काम पूर्ण झालेलं आहे लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. मी माझी कागदपत्रे इनकम टँक्स आणि ईडीला दिलेली आहेत. हे घोटाळेबाज मला अडवण्यासाठी माझावर हल्ले करतात. पण त्यात त्यांचे पाय खोलवर अडकलेले आहेत. मला कागदपत्र कोणी दिली याचा तपास उद्धव ठाकरे यांनी करावा. त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे. मला कागदपत्र देणाऱ्यांना मी संरक्षण देतोय. मला रामदास कदम यांनी दिली असं मी म्हणणार नाही. मला वेगवेगळी लोक कागदपत्र देतात. मिलिंद नार्वेकर यांच्यासंदर्भातली कोणी दिली असाही तुम्ही मला विचारलं, ते त्यांनी शोधावं मी सांगणार नाही, असेही सोमय्या म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ते कोल्हापूरला निघाले होते. मात्र, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर त्यांना पोलिसांनी घेराव घातला. तरीही सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चढले. त्यानंतर अनेक स्थानकांवर त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, कराड स्थानक येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि शासकीय विश्रामगृहावर नेले. त्यानंतर सोमय्या मुंबईला परतले. पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे त्यांनी अधिक आक्रमक पद्धतीने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com