तीन तिघाडा-काम बिघाडा सरकार, पंकजा मुंडेंची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

तीन तिघाडा-काम बिघाडा सरकार, पंकजा मुंडेंची टीका

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने अद्यापही ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा मार्गी लावला नाही. अद्यापही इम्पिरिकल डेटा (Imperical data) गोळा केला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यामागे सरकारचा हात आहे. सरकारने योग्य निर्णय घेतले असते तर संप चिघळला नसता. या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे. यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे अशा समस्या निर्माण होत आहेत, अशी टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला.

हेही वाचा: ''पुरावा दिला तर बक्षीस देईन'', मलिकांनी शेअर केला क्रांतीच्या चॅटचा स्क्रीनशॉट

महाराष्ट्रात काय चाललंय असं म्हणण्याची वेळ आली आहे. सत्तापरीवर्तन झाल्यानंतर जनतेच्या हिताच्या दृष्टीने काम करायला पाहिजे होती. सत्तेत अनुभवी लोक आहेत. त्यांना जनतेची नाडी माहिती असते. जनतेच्या हिताच्या गोष्टी राबविणे महत्वाचे होते. पण, असं कुठेही दिसत नाही. ओबीसी आरक्षण हे स्थगित झाल्यानंतर रद्द होईपर्यंत जो कालावधी मिळाला त्यात महाराष्ट्र सरकारने सकारात्मक पावले उचलली असती, तर ओबीसीचे आरक्षण टिकले असते. इम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भात सतत न्यायालयाकडून मागणी होत असताना देखील सरकारने १५ महिन्यात डेटा गोळा केला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी द्यायला पाहिजे. या सरकारकडे बलाढ्य मंत्र्यांच्या चुकीच्या गोष्टी पाठिशी घालण्यासाठी निधी आहे, पण ओबीसीच्या इम्पिरिकल डेटासाठी निधी नाही, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

महाराष्ट्र दुष्काळग्रस्त होता. या सरकारमध्ये अतिवृष्टी झाली आहे. पाणी कमी झालं किंवा जास्त झालं ही समस्या नाही. तर लोकांची घरे आणि शेतातील पिके वाहून गेली आहेत. आमचे विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. त्यावेळी सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नाही, असं सरकारने सांगितलं. या परिस्थितीत वीजबिलाची सक्तीने वसुली केली जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. गरीबांनी लाखोंची वीजबिल कसे भरायचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे. यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे अशा समस्या निर्माण होत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप गंभीर आहे. मी देखील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. मात्र, सरकारने अजूनही तोडगा काढत नाही. काही निर्णय घेणे नक्कीच कठीण आहे. पण, संभाषणाने मार्ग निघू शकतो. पण, सरकार संभाषण करायला तयार नाही, असंही मुंडे म्हणाल्या.

loading image
go to top