Maharashtra Politics: "राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर, महाराष्ट्राचा भाग मागायला गेलेत" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: "राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर, महाराष्ट्राचा भाग मागायला गेलेत"

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. यावरून राज्यातील विरोधी नेते टीका करताना दिसून येत आहेत.

आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे. या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील मविआच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे. यावरूनही मुनगंटीवार यांनी मविआवर निशाणा साधला आहे.

'राज्यातील नेते कर्नाटकमध्ये शपथविधीसाठी नाही तर महाराष्ट्राचा भाग मागायला गेले आहेत. या संदर्भात ते संध्याकाळी पत्रकार परिषद घेतील आणि तसं पत्र देखील आणतील. आमचं सरकार होतं, तेव्हा तिथे भाजपचं सरकार असल्याची ओरड ते करत होते', असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी बोलताना लगावला आहे.

महाराष्ट्रातून कोणाला निमंत्रण?

कर्नाटक काँग्रेसकडून महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील या नेत्यांना निमंत्रण

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा प्रमुख अखिलेश यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.