वाघाचे संवर्धन व संरक्षण होणार : मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

मुंबई : चंद्रपुरात पट्टेदार वाघ अडकला असल्याचे विचारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी वाघ कोणताही असो त्याचे संवर्धन व संरक्षण केले जाणार हे निश्चित आहे असा सूचक इशारा दिला आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरून जोरदार हालचाली सुरु असताना आज (बुधवार) राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. जोरदार पावसामुळे राज्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवार म्हणाले, की आजच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसली तरी गोड बातमी कधीही येऊ शकते. युतीच्या विभाजनासाठी प्रयत्न केले असले तरी ते यशस्वी होणार नाहीत. कोण अडून बसले आहे हे वेळ आल्यावर कळेल. 70 लाख हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com