विधानसभेसाठी 'मनसे'तही भाजप नेत्यांचा प्रवेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीपासूनच सत्ताधारी भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेशासाठी रांग लावली होती ती अद्यापही सुरूच आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत पक्षाची झालेली घसरण आणि लोकसभा निवडणुका न लढविणाऱ्या "मनसे'त देखील इनकमिंग सुरू आहे. "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे मोठ्या जोमाने मैदानात उतरणार आहेत. 

मुंबई : लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे. आगामी विधानसभेच्या तयारीसाठी उमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी "मनसे'त प्रवेश केला आहे. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीपासूनच सत्ताधारी भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेशासाठी रांग लावली होती ती अद्यापही सुरूच आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत पक्षाची झालेली घसरण आणि लोकसभा निवडणुका न लढविणाऱ्या "मनसे'त देखील इनकमिंग सुरू आहे. "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विधानसभेसाठी राज ठाकरे मोठ्या जोमाने मैदानात उतरणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या "मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांचा युवकांवर मोठा प्रभाव आहे. रोज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विविध पक्षांतील नेत्यांची मोठी रांग लागलेली असते, मात्र आज याच्या उलट चित्र पाहायला मिळाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतून "मनसे'ने माघार घेतली असली, तरी विधानसभेच्या दृष्टिकोनातून पक्षाची जोरदार हालचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर "मनसे'मध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. काल उमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. 

ठाणे-पालघर या भागातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिका-यांनी कृष्णकुंजवर मनसेत प्रवेश केला. दिवा, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार येथील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीदेखील या वेळी प्रवेश केला. 

दरम्यान, मनसेसाठी प्रतिकूल असणारी कॉंग्रेसदेखील आपली भूमिका बदलताना दिसत आहे. महाआघाडीमध्ये मनसेला घेण्यास विरोध करणाऱ्या कॉंग्रेसच्या लक्षात आता मनसेची ताकत आली आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आता कॉंग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

Web Title: BJP leaders enters MNS for upcoming Maharashtra assembly election