भाजपच्या जेलमधून सुटल्यानंतर आमच्या आमदारांमध्ये वाढ होईल : रणदीप सुरजेवाला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

'सर्वोच्च न्यायालयासमोर आज 162 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज आम्ही सादर केले आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांच्या सह्या आहेत. यातून आमचे बहुमत सिद्ध होते. भाजपने स्थापन केलेले सरकार हे अनैसर्गिक आहे.' असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : 'सर्वोच्च न्यायालयासमोर आज 162 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आज आम्ही सादर केले आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांच्या सह्या आहेत. यातून आमचे बहुमत सिद्ध होते. भाजपने स्थापन केलेले सरकार हे अनैसर्गिक आहे.' असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. 

भाजपने लपवून ठेवलेले व भाजपच्या जेलमधून सुटल्यानंतर आमच्या आमदारांमध्ये वाढ होईल. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार हे अनैसर्गिक आहे. या दोघांनी मिळून जनमत व लोकशाहीला पायाखाली चिरडलं आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी यावेळी केला.

तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकार स्थापन करू इच्छिते. आमच्याकडे बहुमत आहे. बहुमत चाचणी दिवशी आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. उद्या बहुमत चाचणीची तारीख कळेल व सगळं स्पष्ट होईल.''

भाजपला बहुमत सिद्ध करायला आणखी एक दिवस दिला आहे. असे करण्याची गरज काय, घोडबाजार करायला ही मुदत दिली आहे का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. मुकुल वासनिक यांनीही भाजप व अजित पवारांचे हे अनैसर्गिक सरकार आहे, असे म्हणत या सर्व प्रकारावर टीका केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-led govt in Maharashtra illegitimate says Randeep Surjewala