आता भाजपची ‘महाजनादेश यात्रा’

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘महाजनादेश’ यात्रेचे आयोजन केले आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘महाजनादेश’ यात्रेचे आयोजन केले आहे.

या आठवड्यापासूनच आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा जळगाव येथून सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे युवकांसोबतच शेतकऱ्यांशी संवाद साधत असून, त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य यांचे नेतृत्व जनतेच्या मनावर बिंबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे; तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे. आगामी विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. त्यामुळे भाजपदेखील जोमाने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahajanadesh Yatra Politics